STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

पाऊस पाणी

पाऊस पाणी

1 min
285

पावसाळा सुरु झाला तरी

अजून पाऊस पडत नाही

शेतात पेरले बियाणे म्हणून

रातभर झोप लागत नाही


पीक लहान असताना त्याची

घ्यावी लागते काळजी खूप

औषध-पाणी वेळेवर मिळाले

तेव्हाच तर दिसेल सुंदर रूप


एकदा झाले मोठे पीक

की काळजी ना तमा

थोडी जरी केली देखभाल

काही तरी होईल जमा


वेळेवर मिळाले खत पाणी

तर शेतातील पीके बहरतील

हिरवे हिरवे रान पाहुनी मग

शेतकऱ्यांची ही मने डुलतील


त्यासाठी गरज आहे शेताला

वेळेवर पाऊस-पाण्याची

पीके वाचतील आणि मिळेल

तेव्हाच शेतकऱ्यांच्या जीवाची हमी


साहित्याला गुण द्या
लॉग इन