पाऊस-कविता
पाऊस-कविता
आला,आला पावसाळा अंग ओलेचिंब करण्याला
त्याच्या सुंदर सरीने आनंद मनाला देण्याला
झाला धरतीला आनंद
न्हाऊन निघाली पाऊसाने
सरला दाह धरतीचा
पहिल्या पाऊसाच्या येण्याने
ओली झाली झाडे वेली
पाऊस पडे त्यांच्यावर
साचे पाऊसाचे थेंब
जणू वाटे मोती गवतांवर
सरले मनातील दु:ख
त्याच्या सुखद येण्याने
झाला शेतकरी खूष
औत धरी बैलजोडीने
दिसे आभाळात शोभून
इंद्रधनुष्य कमान सुंदर
झाले निरभ्र आकाश
सुटे गार वारा भूवर
सारे पशू पक्षी आनंदले
भरारी मारी गगनात
पाऊस जणू तो सखा
सांगे निरोप विश्वात
भरले ओढे,नदी,तलाव
केली मानवाची सोय
काळजी त्याला सर्वांची
जाणतो सर्वांचे हृदय
केली हिरवीगार सृष्टी
दिसे हिरवे शिवार
काळ्या वावरात शोभे
हिरवी पिके डौलदार
फुले रानीवनी फुलली
सुगंध दरवळे चौफेर
फुलपाखरे येती खेळण्यास
खेळे त्यांच्या अंगावर
