पाऊस आणि आठवण
पाऊस आणि आठवण
1 min
257
चिंब भिजे पावसात
मन बसतं ढगात
मोहरतीत सारे भाव
आठवणींच्या जगात ||१||
विजांसोबत होतो
ढगांचा हा लपंडाव
आठवणींनी सजतो
माझीया मनाचा गाव ||२||
संथ धार पावसाची
साथ तिस वादळाची
फुले बाग आठवांची
वाहे नदी आसवांची ||३||
दररोज श्रावणात
मेळ ऊन पावसाचा
सोबती माझ्या सदैव
असा खेळ संचिताचा ||४||
