पाऊल वाट
पाऊल वाट
1 min
234
पाऊल वाट ही माझी,
ओढ गावी जाण्याची.
माणसात माणूसकी भेटेल,
म्हणून आनंदाने गावी जायची.
सरड्याची धाव कुंपणा पर्यंत,
तसेच मुंबई ते गाव पाऊलवाट ही काही....
कधी कुणाच पडत नी आपणास मिळत.
हाच रूबाब चेहऱ्यावर खुलतो तो पाही...
तळे राखे तो पाणी चाखेल.
अस होतय खरे काही...
चोरांच्या उलट्या बोंबा
करत श्रीमंत झालेत काही...
ताका पुरते रामायण,
अशी नाती झालीत काही...
पालथ्या घडावर पाणी सोडून,
विसरले मी सर्व काही...
गाव माझ चांगल, वेळेला धावत.
दोन्ही हाताची बोट सारखी नाही.
फुल ना फुलांची पाकळी,
ही माणुसकी जपणारे आहेत काही...
