STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

पाठवणी

पाठवणी

1 min
11.5K

संसाराच्या वाळवंटात,

स्वप्नपरी होऊन आलीस.

बाळलीला पाहून तुझ्या

नक्षत्रांची देण्यात बरसलीस.


तुझे हासू अस्तित्व देऊन जाई,

बोबडे बोल, ते जीवन उतराई.

खेळ,पसारा, शिक्षणात रमलो.

सुख देण्यास मी सदैव जगलो.


लाडाची लेक झाली मोठी,

पाठवणीचा विचार काळीज फोडी.

कन्यादानाच्या रितीने हळहळलो,

अंश्रू, हुंदका लपवित जगलो.


नियतीने हिरावलेली माय माझी,

तुझ्या रूपात संसार स्वप्न पाहे माझी.

लग्नाची पाठवण दुनियेची रित सारी,

आतड्यांचा पिळतो मजवर भारी.


Rate this content
Log in