पाठवणी
पाठवणी
1 min
11.8K
पाठलाग तो मनाचा,
आठवणीच्या क्षणांचा.
हरवलेल्या निरागस भेटीचा,
आतूर मिलनाचा गाठीभेटीचा.
बालपणीच्या मैत्रिणीचा,
आनंद स्वच्छंदपणे बागडण्याचा.
स्वप्नपूर्तीसाठी लगबग तारुण्याचा,
पाठलाग तो धावणाऱ्या वयाचा.
पाठलाग जीवन जगण्याचा संघर्षाचा.
नकळत अर्धावर सोडून गेलेल्या प्रिय जनांचा.
भूतकाळ व भविष्काळात रमण्याचा.
काळावर मात करत विजयभेटीचा.
पाठलाग जीवाला जीव देणाऱ्याचा,
आयुष्यातील चढ उतार उजळणीचा.
काळजात घर करणाऱ्यांचा,
संकटात साथ देणाऱ्या देवदेवतांचा.
छळतो पाठलाग अंतिम श्वासाचा.
शेवटचा श्वास असावा सुखाचा.
हरिनाम घेत निरोप सर्वांचा.
मातीत मिसळत वैकुंठ भेटीचा.
