पाठवणी
पाठवणी
पाठवणीचा हा खेळ खेळसी सारा,
पाहशी दूरून भेट्टीगाठीचा पसारा.
बनवून नाचवी कटपुतलीचा मोहरा,
मायाजालात फसवून तो भोवरा.
बाललीलेत अस्तित्वाचे खुले आगंण,
जीवनाच्या वाळवंटी शोधत चांदण.
शाळा ते लग्नमंडपी सुगंधी प्राक्तन.
पाठवणीत झरझरले अश्रूंचे आंदण.
कुणीतरी शोधत हक्काचे समजणारा,
जीवनातील खाच खळग्यात जपणारा.
आनंदी सुखाच्या सावलीत मोहरणारा,
हुंदकांच्या झंझावात सदा सावरणारा.
तारुण्य वार्धक्यात हळूहळू झुकलेले,
बिलोरी मनमोर रम्य संसारी गुंतलेलेे.
क्षुद्र लौकिकाची खोटी नाती पांघरून
सप्तस्वर्ग चालून येता, मोल कळलेले.
ह्दयाच्या कुपीत पाठलाग कस्तुरीचा,
आठवणीत मोरपंखी प्रत्येक क्षणांचा.
हरवलेल्या जीवलग प्रिय व्यक्तींचा,
अतुट ऋणानुबंधाच्या पाठवणीचा.
पाठवणीचा अंतिम श्वास तो खुणवत,
सारे तिथेच ठेवून एकटीस बोलवत.
पाहे, मतलबी हव्यासी पुतळे ते रडत.
साऱ्यांस जायचे चक्रव्यूह ऋण फेडीत.
