पारिजातक
पारिजातक
1 min
435
उमलून ते कळीचे फूल झाले.
नवचैतन्यात सुंगधाने सर्व न्हाले.
पसरूनी शांत मृदगंध दरवळले,
आनंदाने ते मन मोहरू लागले.
अंगणी अमृताचे पसरून चांदणे,
सप्तसूराचा आनंद दरवळूनी.
नवचैतन्याची शाल पांघरूनी,
घ्यावी फुलांची ओंजळ भरूनी.
भाग्यवान होती, देवाच्या चरणी,
सुंगधांचे कलश वाहे भरूनी.
सांगे,मरावे पण किर्ती रूपे उरावे,
चराचराला सर्वस्व उजळवूनी.
पारिजात दातृत्वास बहरला,
आशा जगण्याची भुईवर आला.
खेळ प्राक्तन, वाटेवरील फुलांचा.
मातीत जळण्यास जन्म झाला.
