पाप
पाप
1 min
358
प्रेम तुझ्यावर, केलं नां मी पाप
रडवू नको तुला लागेल रे श्राप...
पायातले मला बूट समजतोस
माझ्यावर इतकं का रागावतोस
काय चूक माझी मी केला तुझा जाप...
साऱ्या जगाला तू बाजूला ठेव
मी मानते रे तुला माझा देव
का डसतो मला हा दुराव्याचा साप...
संगम मी का दुःखाच्या पिंजऱ्यात
उघडं दार ठेवं मला तुझ्या आसऱ्यात
पळू किती मागे सारखी लागे धाप...
कलाकार तू दाखवी कलाकारी
मी तुझ्यासाठी फिरते मारीमारी
माझं दुःख कर तू कधी बसून माफ़....
