STORYMIRROR

Santosh Jadhav

Others

3  

Santosh Jadhav

Others

पांडूरंगा

पांडूरंगा

1 min
13.9K


वारी तुझी पांडूरंगा

एक अनोखा भक्तीमार्ग

धान्य पेरलेल्या बापांचा

भरतो रस्त्यात वर्ग

 

भेटीसाठी भक्त तुझ्या

चालतो पावन वाट

माऊलींनी भरलेली

गर्दीची रे लाट

 

किर्तनाचे मधुर स्वर

वाट जवळ करती

श्रध्देच्या समुद्राला

वारक-यांची भरती


साहित्याला गुण द्या
लॉग इन