पाईक संविधानाचे
पाईक संविधानाचे
1 min
578
पाईक संविधानाचे
ज्यांनी दिले महान संविधान
त्यांचाच येथे होतो अपमान
तरीही मग आम्ही कसे?
पाईक संविधानाचे.
साऱ्या जगाने मानले
पण ते आपल्यांनाच बोचले
करतो आम्ही गोष्टी येथे
संविधान बदलण्याच्या
तरीही मग आम्ही कसे?
पाईक संविधानाचे.
संविधानासाठी झटणारे
येथे ठरतात देशद्रोही
संविधानाचा अपमान करणारे
येथे फिरतात शाही
तरीही मग आम्ही कसे?
पाईक संविधानाचे.
