ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या
ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या
1 min
506
ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या
झोळीत भावना कैक
शब्द कुठं अन कसं पेरू?
याचीच पडलीय मला मेख II
शब्द तो परतुनी येता
भावना ती तीव्र होई
शब्द तो परतुनी येता
भावना ती तीव्र होई
उतरता दौतीतुनी तर
मन मात्र शांत होई
तृप्त होता मन माझे
शब्द होई नाहीसा
भावनांनी पुन्रजन्मायचा
घेतला आहे वसा II
शब्द जोडे भावनेला
साद मन जे घालिती
सोडवी कोडे क्षणात
भावना ज्या मांडती
शब्द वाहे भावनांना
नित्य फिरुनी जन्मती
शब्द माझा सोबती, गड्या
अन्...
शब्द ती सरस्वती II
