STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Others

3  

Rajendrakumar Shelke

Others

ओझरचा राजा विघ्नेश्वर माझा

ओझरचा राजा विघ्नेश्वर माझा

1 min
187

ओझर क्षेत्री ! कुकडी तीरी !

श्रीगणेश स्वारी!विराजली !!


भाद्रपद मास!श्री जयंतीला! 

उत्सव आपुला! घरोघरी!!


ओझर तीर्थी!भक्तांचा मेळा!

आनंद सोहळा! चैतन्याचा!!


प्रथम वंदन! देवा गणेशा!!

बुध्दीच्या कलशा!अंतर्मनी!!


दुमदुमली नगरी!या भक्तीत!

रंगला नामात! जयघोष!!


दर्शनाने तुझ्या!लागे हुरहूर !

तीर्थक्षेत्र ओझर! पुण्यवान!!


श्रीगणेश पुराण!कथा सांगे!

अभंग ही रंगे! विघ्नेश्वराचा!


Rate this content
Log in