ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

197
प्रफुल्लित श्रावणात पहिली रिमझिम सर,
दरवळला मातीचा गंध, आली नवी बहर.
पानाफुलांवर पडती थेंब ते टपोर,
सरींमध्ये भिजताच सुखावला चकोर.
मनी दाटले आनंदाचे सप्तसूर ,
त्या तालावर नाचे मनसोक्त मयूर.
बळीराजाने पाहिली चातकासारखी वाट ,
शेतपिकांमध्ये आता असेल त्याचा थाट.
शुष्क मनावर ओलाव्याचा साज,
जनसृष्टीवर जणू वसुंधरेचा माज.
उसळणारा गार गार वारा ,
अंगी उठे एकच शहारा.
माझ्या मनाच्या आत तो जिव्हाळा,
ओढ लावतो मज हा पावसाळा.