STORYMIRROR

prasad koltharkar

Others

3  

prasad koltharkar

Others

होळी

होळी

1 min
463

शिशीर संपुनी, झाले वसंताचे आगमन.  

फाल्गुन पौर्णिमा घेऊन आली होळीचा सण. 

होळी रे होळी, पुरणाची पोळी.

धरून ताल देऊ एकच आरोळी.

होळीभोवती फेर धरून होऊ सारे दंग. 

हर्ष-उल्हासाने उधळू, रंगपंचमीचे रंग.

रंग टाकू एकमेकांवर, विसरू सारे द्वेष.

प्रेम देऊ, प्रेम घेऊ, संपवू सारे क्लेश.

फुलवूया जीवन, करु रंगांची उधळण.

प्रफुल्लित मनाने करू दुष्टांचे दहन.


Rate this content
Log in