आई
आई
1 min
271
निसर्गाने भरली आपणा सर्वांची झोळी,
सावलीशी उभी राहिली आई वेळोवेळी.
देवाच नाव घेऊन करत राहीली उपवास,
मला मात्र मायेने भरवला प्रत्येक घास.
जन्मोजन्मी टिकू देत ह्या ऋणानुबंधाच्या गाठी,
माझ्या आईचे नाव सतत राहो माझ्या ओठी.
आई सोबत असता संकटांचा विसर पडे,
माझ्या आईला उदंड आयुष्य लाभो हेच साकडे.
