बाप
बाप
1 min
75
बालपणी संस्कार घडावे, म्हणून केले सर्व काही
त्याच्या सततच्या धाकामुळे होत असे अंगाची लाहीलाही
खरंच आम्हाला बाप कधी कळलाच नाही
आमच्या प्रत्येक गरजांसाठी पडला कैकांच्या पायी
आमच्या प्रत्येक स्वप्नाची त्यानेच दिली ग्वाही
खरंच आम्हाला बाप कधी कळलाच नाही
व्रृद्ध होऊन कोपर्यात पडलेला तो कधीच डोळ्यांना दिसला नाही
आज सोबत नसूनही त्याची आठवण सतत येत नाही
खरंच आमच्या निर्दयी मनाला बाप कधी कळलाच नाही
