स्त्री
स्त्री


देवा सुंदर जगामध्ये केलीस एक किमया,
दिलीस अप्रतिम भेट स्त्रीची माया.
श्रुंगारात घडविलेस तिचे मोहक रुप,
बहुरंगी बहुअंगी असे तिचे स्वरूप.
कोणी म्हणाले काय अडेल स्त्री जर का नसेल संगती?
अरे मुर्खा जरा विचार स्वतःला आलास कसा ह्या जगती?
हिंदवी स्वराज्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोल,
तरी आपण हे स्वप्न जगावे हे होते जिजाउंचे बोल.
स्त्रीच्या वचनाची कीती द्यावी महती?
सत्यवानाचे प्राण वाचवले अशी थोर सावित्री.
आज स्त्रिया अग्रेसर असून करतात दिरंगाई,
पण त्यांच्या शिक्षणाचा पाया रचला त्या सावित्रीबाई.
स्त्रिया आज खरच दिसतात अग्रेसर,
तरी आम्हास अजूनही नाही त्यांची कदर.
सतत केली कुचंबणा विटंबना अशा माउलीशी,
पदोपदी हेच विसरतो की तीच आहे आपल्या सावलीशी.
छळ,भांडण आणि हुंडाबळी,
गर्भात आली म्हणून घेतला तिचाच बळी.
जर का संपवून बसलो आज तीची माया,
तर वंशासाठी कोणास द्यावी काया?
खरच देवा आहोत तुझे ऋणी,
आता स्त्रीला दुखवणार नाही कोणी.
करु एक प्रण ह्या जगासमोर आज आपण,
कोणी करणार नाही ज्याने दुखावेल तिचे मन.
तिच्या सहवासात आम्हीही करू प्रगती,
बरेच आहेत उपकार अशी तिची महती.
मानवतेला साह्य करू, ना करू कुठले दूषणं,
तुझ्याच गळ्यातले दोन ताईत बनू, तुझेच भूषण.