ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

104
पावसाच्या सरींची सुरुवात
जून महिन्यापासून सुरू होते
अंगणातल्या मातीतला सुगंध
दरवळण्यास सुरुवात होते
नयन रम्य निसर्गा मध्ये
पाऊस पडत असतो तेव्हा
हिरवगार रान बघण्याचा
आनंद होतो मला तेव्हा
नदीनाले सागर भरती
ओहोटीला उधान येती
पुरा संगे झोपडी तले
कुटुंबही उध्वस्त होती
श्रावणातल्या सरींचा
ऊन-पावसाचा खेळ चालती
आकाशातील इंद्रधनुष्याचा
झोपाळा ही सर्वे बघती