जागृत स्त्रीशक्ती
जागृत स्त्रीशक्ती
1 min
252
स्त्रीत्वाचे जीवन फारच कठीण असते
उंबरठ्यावर उभे राहून तिने
स्वतःला सावरायचे असते
जगातील स्त्रीच्या समस्यांचे
निराकरण करायला तिला फार आवडते
पण कुठे तरी काटा बोचतो
म्हणून ती जरा चाचपडते
आयुष्य खडतर असले तरी
ते सुशोभित करण्याचे
धाडस तिला उमगते
म्हणून स्त्रीत्व जगवतांना
कळीतच ती उमलते
दूर असलेल्या सुखदुःखाच्या डोंगरातही
त्याच्या ती रथ बनते
आणि सारथी होऊन न डगमगता
यशाचे चक्र ती फिरवित असते
अश्याच अनेक जागृत स्त्रीत्वाला
त्रिवार वंदन त्रिवार वंदन
