नयनरम्य हिरवी पालवी
नयनरम्य हिरवी पालवी
1 min
720
नयनरम्य निसर्ग हा
दिसे चहुकडे
डोंगर कडे कपारी
वाहे नदि खळखळ ।।1।।
झाडांची गर्द दाटी
मनमोहक वाटे मनी
हिरवा निसर्ग
खुलवीत बहर वनी ।।2।।
कौलारू घर टुमदार
दिसे शोभिवंत
निसर्गात दडलेले
गाव हे नयनरम्य ।।3।।