Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shreya Shelar

Others

4.0  

Shreya Shelar

Others

नवरा

नवरा

2 mins
484


नवरा म्हणजे समुद्राचा 

भरभक्कम काठ 

संसारात उभा राहतो

पाय रोवून ताठ   ll

 

कितीही येवो प्रपंच्यात

दुःखाच्या लाटा

तो मात्र शोधीत राहतो

सुखाच्या वाटा  ll   


 

सर्वांच्या कल्याणा करता

पोटतिडकीने बोलत राहतो

न पेलणारं ओझं सुद्धा 

डोक्यावर घेऊन चालत राहतो ll

 

कधी कधी बायकोलाही

त्याचं दुःख कळत नसतं

आतल्या आत त्याचं मन 

मशाली सारखं जळत असतं ll

 

नवरा आपल्या दुःखाचं 

कधीच प्रदर्शन मांडत नाही 

खूप काही बोलावसं वाटतं

पण कुणाला सांगत नाही  ll

 

बायकोचं मन हळवं आहे

याची नवऱ्याला जाणीव असते 

दुःख समजून न घेण्याची 

अनेक बायकात उणीव असते ll

 

सारं काही कळत असून

नवऱ्याला अपमान गिळावे लागतात 

वेदनांना काळजात दाबून

पुन्हा कष्ट उपसावे लागतात  ll

 

सगळ्यांच्या आवडी जपता जपता 

मन मारीत जगत असतो 

बायको , पोरं खूष होताच

तो सुखी होत असतो ll

 

इकडे आड तिकडे विहीर 

तशीच बायको आणि आई 

वाट्टेल तसा त्रास देतात 

कुणालाच माया येत नाही ll

 

त्याने थोडी हौसमौज केली तर

धुसफूस धुसफूस करू नका

नवऱ्या विरुद्ध विनाकारण

दारू गोळा भरू नका ll

 

दोस्ता जवळ आपलं मन

त्यालाही मोकळं करावं वाटतं

हातात हात घेऊन कधी

जोर जोरात रडावं वाटतं ll

 

समजू नका नवरा म्हणजे

नर्मदेचा गोटा आहे

पुरुषाला काळीज नसतं

हा सिद्धांत खोटा आहे ll

 

मी म्हणून टिकले इथं

दुसरी पळून गेली असती

बायकोनं विनाकारण

नवऱ्याला धमकी दिलेली असती ll

 

घरात तुमचं लक्षच नाही

हा एक उगीच आरोप असतो

बाहेर डरकाळ्या फोडणारा

घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll

 

सारख्या सारख्या किरकिरीनं

त्याचं डोकं बधिर होतं

तडका फडकी बाहेर जाण्यास

खूप खूप अधीर होतं ll

 

घरी जायचं असं म्हणताच

त्याच्या पोटात गोळा येतो

घरात जाऊन बसल्या बसल्या

तोंडात आपोआप बोळा येतो ll

 

नवरा म्हणा , वडील म्हणा

कधी कुणाला कळतात का ?

त्यांच्या साठी कधी तरी 

कुणाची आसवं गळतात का ? ll 

 

पेला भर पाणी सुद्धा

चटकन कुणी देत नाही 

कितीही पाय दुखले तरी 

मनावर कुणी घेत नाही ll

 

वेदनांना कुशीत घेऊन 

ओठ शिउन ' तो ' पडून राहतो 

सर्वांच्या सुखासाठी 

एकतारी भजन गातो ll

 

बायको आणि मुलांनी 

या संताला समजून घ्यावं

फार काही नकोय त्याला 

दोन थेंब सुख द्यावं  ll

 

मग बघा लढण्यासाठी

त्याला किती बळ येतं

नवऱ्याचं मोठेपण हे 

किती जणांच्या लक्षात येतं ? ll


Rate this content
Log in