नवीन वर्ष साजर
नवीन वर्ष साजर
1 min
422
नवीन नवीन प्रेम आहे आपलं तुटलं
नवीन वर्ष कोणासोबत साजर करशील.....
दुराव्याची तू ठेवली होतीस आस
तुझ्यासाठी आज कोण बनला खास
हळूहळू साजणी तू माझं प्रेम विसरशील....
विषारी नागिन बनून तू मला चावलं
माझं सोडून तूला कोणाचं प्रेम पावलं
येतील सुखाचे दिवस तू प्रेमासाठी झुरशील.....
ठेवला नवीन वर्षात तू कोणावर डोळा
त्याला लुटू नको राणी तो साधा भोळा
पैसे पैसे करून तू आणखी किती मरशील.....
प्रेमाचा सोडून मी केला कवितेचा ध्यास
तुझ्यावर लिहून संगम बनला शब्दांचा श्वास
झालं माझं नावं ऐकून तू तूझं सारं हरशील.......
