नुतन वर्ष 2020
नुतन वर्ष 2020
भेटतात दोन्ही वर्षे तिथे
जिथे एक संपतो
आणि लगेच दुसरा
तातडीने सुरू होतो..१
जे गेले तेही चांगलेच होते
एक वर्ष बरोबर राहिले
आमचे गुणदोष त्याने
पूर्ण वेळ खरोखर पाहिले.. २
विसरून सारे मागचे आम्ही
नव्या पहाटेचे स्वागत करू
बलशाली राष्ट्र करण्यास
नव तंत्रज्ञान अवगत करू.. ३
टाकून जुनी विचारी कात
नव्या विचाराने फुलावे
येतील मार्गी अडथळे
त्यास आनंदाने झेलावे.. ४
माणसाचे आयुष्य उत्साही आहे
त्याला जुने टाकण्याची सोय आहे
आणि पुढील नवीन
गोष्टी करण्याची होय आहे.. ५
निसर्गात नियम आहे
माणसाला ते पाळावे लागतात
असतील दुःखे थोडेफार
वेळेनुसार आळावे लागतात.. ६
नव वर्षी जपू नाते प्रेमाचे
ठेऊ माणुसकी प्रत्येका उरात
सगळे भेद विसरून सारे
राष्ट्रगाणे गाऊ एका सुरात.. ७
