STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

नुसताच भार आहे

नुसताच भार आहे

1 min
97

जो थांबला जगी तो नुसताच भार आहे 

संवेदना निकाली शब्दास धार आहे....!!


गोठ्यात गाय असते आनंद वारसाचा

कोठेच वासरा तो का भेटणार आहे...!!


आले तसेच गेले वाटा दिसे न त्यांना

पाझर फुटेल ऐसी सरितेस धार आहे..!!


संवाद तो मनाचा व्हावा खुल्या दिलानी

दुःखात जीवनाला तो तारणार आहे...!!


स्वार्थात धूंद सारे नाही कुणी कुणाचा  

आधार भासले जे ते ही फरार आहे...!!


मिसळून चालणारा श्वासात भास कोठे

नाही कधी दुजोरा भाजीत खार आहे..!!


ना काल मज सुखाचा येथे कधी मिळाला

डोळ्यात आसवांची दररोज धार आहे..!!


साधावयास मतलब जगतो जगात कोणी 

त्याला जगात कोठे कसलाच भार आहे..!!



Rate this content
Log in