नटले रूप देवीचे
नटले रूप देवीचे
सौंदर्य देवीचे । ममत्व नटले ।
प्रेमाने भिजले । तेजोमय ।।१
डोळ्यात काजळ।भक्तांच्या रक्षणा।
आरती औक्षणा । व्हावे सज्ज।।२।।
मळवट भाळी । रक्तवर्णी लाल ।
सौभाग्य मशाल । जळो नित्य ।।३।।
कानात कुंडल । लोमकते डुल।
एकू यावे बोल । आर्त हाक ।।४।।
कंठमणी गळी । ठूशी शोभे दाट।
सोन्याची पहाट । उगविते।। ५।।
माथी जे मुकूट। माणिक सजले।
मोती सजविले। मान तुझा।।६।।
शालू भरजरी । शोभे नक्षीकाम।
हाती चुडा नाम । सौभाग्याच्या ।।७।।
कमरी हा पट्टा । बाजूबंद शोभे ।
चाळ ही विलोभे । देवीचिया।।८।।
नथनी नाकात। लाली ग ओठात
हसते गालात । माय माझी।।९।।
चला भरू ओटी। गोजीऱ्या देवीची।
जगत मायेची। नम्रतेने।।१०।।
विलोभनीय हे। रूप जे नटले।
भक्तास पटले । आशिर्वाद।।११।।