नशीबवान
नशीबवान
1 min
142
नशीबवान तर सर्वच असतात
नशिबाला बदलवणारा एखादाच असतो
हसतमुख तर सर्वच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
चमकणारे तर बरेच असतात
प्रखरतेने दिपवणारा एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवला शहाणा करणारा एखादाच असतो
सुखाचे सोबती सर्वच असतात
दुःखाचा साथीदार एखादाच असतो
स्वार्थी तर सगळेच असतात
निस्वार्थी नशीबवान एखादाच असतो.
