नशा तुझ्या प्रेमाची
नशा तुझ्या प्रेमाची
1 min
150
नशा तुझ्या प्रेमाची
निसर्गा वसे मनात
होताची सकाळ मी
येते तुझ्या सानिध्यात
किती आनंद मिळतो
नभी पाहूनी आदित्य
आनंदाने पुलकित
होते माझे मन नित्य
हळुवार पसरे पसारा
रवी, सोनसळी किरणांचा
होई लाजत प्रभात
क्षण प्रफुल्लित होण्याचा
नशा , सृष्टीच्या प्रेमाची
चढे वसंत ऋतु येता
पहा कशी धरा सजली
नशा चढते प्रेमाची आता
हरएक ऋतु असे
आगळाची अवर्णनीय
किती करावे गुणगान
नशा तव प्रेमाची रमणीय