नोकरी
नोकरी
1 min
256
कमविली मेहनतीने भाकरी
करून दिन रात हॉटेलमध्ये नोकरी.....
लोकांनी खाल्लेले ताट धुतले
त्यात माझे मी सारे अश्रू ओतले
लाज ही वाटली तरी केली चाकरी.....
शिव्या ही दिल्या मला लोकांनी
हरलो ना कधी स्वप्नांच्या चाकांनी
घातले नव्हते कपडे ते कधी धोतरी.....
अवघड वेळ होती ती त्रासदायक
कामात झालो ना कधी नालायक
ध्यानीमनी ती टीका माझ्या बोचरी......
कष्ट करून आज कमावलं नावं
संगमच आज डोळ्यासमोर गाव
एक खंत सोडून गेली ती छोकरी.....
