नकोरे आळस
नकोरे आळस
1 min
289
दिखावपणाचे
नकोमित्रा पर्व
सोडूनीदे गर्व
बरंनाही।
करत रहावे
चिंतन मनन
ज्ञानाचे व्यसन
सातत्याने।
दया क्षमा न्याय
पुढे सारणारे
गुण तारणारे
अंगीकार।
चांदना प्रमाणे
सुगंधी भिजत
रहावे झिजत
लोकांसाठी।
खाली वाकतात
वृक्ष फळदार
घेऊनीया भार
नम्रतेने।
अलिमौला म्हणे
क्षमा वैभवात
धीर संकटात
सोडूनये।
'शकील' सांगतो
करारे सायास
नकोरे आळस
स्वभावात।
