नको दुर्लक्ष!
नको दुर्लक्ष!
1 min
166
आकडे हे अगणित आकडे
घालती गोंधळ कधी तर
कधी भासती फाकडे !
आकड्यांची शिडी धरुन
चढतो बाजार
आकड्यांच्या शिडी वरुन
पडतो बाजार !
आकडे मोजता
मिळे सुख कधी
आकडे पाहता
अती दु:ख हो कधी!
परीमाण परीक्षा
परीमिती प्रमाण
पत्रिका ही जुळवती
हे आकडे!
जन्मापासून
हयातभर सदा
साथ देती आकडे
दुर्लक्ष नको याकडे!