निसर्गगान
निसर्गगान
निसर्गाचे विविध रंग डोळ्यात साठवून ठेऊ |
निसर्गाचे हा मुक्त ठेवा जाणिवपूर्वक सांभाळून ठेऊ | |१ | |
विविधरंगी सुगंधी फुले ती मधूर तऱ्हेतऱ्हेची फळे |
पाने वेली तरी किती सुंदर खुलून दिसती येथ मळे | |२| |
आकाशातल्या वर्णाव्या त्या काय रंगबिरंगी धटा |
भेटाया आतुर प्रियाला नवयौवना दिसते जणू उडवित बटा | |३| |
शालू हिरवा नेसते अवनी रेखिते सूर्य कुंकूम कपाळी |
अथांग सागर पाहे कौतुक होऊन जणू वनमाळी | |४ | |
निसर्गाचे या करु या संवर्धन तोच
तारतो या सजीवसृष्टीला |
समतोल गेला तर काहीच सुंदर पहाया नाही उरणार दृष्टीला | |५| |