निसर्ग ज्ञानझरा
निसर्ग ज्ञानझरा
1 min
424
जेथे जातो जेथे गुरु मज दिसतो
निसर्ग असते शाळा अन् मी विद्यार्थी होतो
हंबरते गाय वत्सले वासरु घेते आवगे धाव
वात्सल्याचा तेथेच लागतो मजला ठाव
शीळ सुरेल वाऱ्याची पाखरांचं मुक्त गाणं
ऐकून मिळे नकळत सुरेल संगीताचे ज्ञान
लपेटुन घेता तरुंना विश्वासे घट्ट वेली
आधाराची शिकवण त्यात दिसते लपलेली
फुला फुलांवर मौजे बगडती फुलपाखरे
आनंद उगम स्तोत्र तेथेच दिसते खरे
दौडते आवेगे नदी समावण्यास सागरी
प्रेम ओढ आंतरिक पाझरते तिथे अंतरी
न आटणार कधीच हा अमोघ ज्ञानझरा
मिळतो मनास त्याने नित्य नवा उभारा
