निसर्ग(हायकू)
निसर्ग(हायकू)
1 min
318
वरदान हा
मानवास तो दुवा
निसर्ग ठेवा
भव्य अंबर
सौदर्याची उधळण
उभा डोंगर
गवत तुरे
वृक्षवल्ली बहरे
सात्विक झरे
तृष्णा हरे
बागा दऱ्या पठारे
स्वच्छंदी वारे
क्रुर तो नर
करत प्रदूषित
कारणीभूत
निसर्ग दातृत्व
सर्वोत्तम ती भेट
राखू अस्तित्व
होऊ डोळस
देश करू प्रगत
झाडे लावत
