निर्भया
निर्भया
विषारी या जगात, जीव तिचा गुदमरतो..
क्रूर या अंधारास, श्वास कापरा झुरतो..||
किती क्रुर ती बुद्धी, का निष्ठुर राक्षस जागतो..
इवल्याश्या पाकळीला, असह्य यातना देतो..||
काळोखाच्या आडोशाला, भयाण हास्य हासते..
लढण्यास तिच्या साक्ष ती, बदनाम रात्र आक्रंदते..||
थरथरता जीव मदतीस आर्त हाक घालतो,
प्रसंग कठोर भय काटा वाऱ्यास बोचतो..||
माणुसकीस कापरा थरकाप, भयभीत साक्ष रात्रीची..
निर्भयेच्या झुंझेस संघर्ष नमतो, धैर्य गहिवरतो..||
आता,आत्मसंरक्षणाचा दागिणा घालून, निर्भयातेने लढेल ती..
शौर्याचे प्रेरणास्थान बणून, सन्मानाने जगेल ती||
.
निर्भया..
.