नीती प्रेरणा। पालक...!
नीती प्रेरणा। पालक...!
नीती ,प्रेरणा,पालक
शब्दच किती महान
वाटते या शब्दावरच
भागेल आपली तहान...
नियतीने तरी सध्या
नीती गिळंकृत केली
म्हणून तर नितीमत्त्येची
नितीच नाहीशी झाली...
प्रेरणेच ही तसच
काहीतरी झालं आहे
प्रेरणा घेण्यासारखं
आता तिथे काही उरलं आहे..?
प्रश्न प्रत्येकाच्या मनात
हाच घर करून आहे
वाटत पुढच्या पिढीसाठी
आम्ही काय दिलं आहे...?
लाचारी, भ्रष्टाचार
की निव्वळ नुसता अनाचार
कर्तृत्व आपले इतुके बेजार
पाहून नाही का जडणार आजार...?
आत अंतरात डोकावताना
पालक म्हणून खंत वाटते
उद्याचा विचार करता
खरेच बाबांनो काळीज फाटते...
तरी पण वेळ अजून काही
हातातून निसटून गेली नाही
पालक म्हणून प्रेरणादायी
काहीतरी केल्यावाचून गत्यंतर नाही...
चला उठा जोमाने
पुन्हा एकदा कंबर कसू
झाले गेले विसरून जाऊ
आणि एक नवा इतिहास घडवू...
नियतीने जीवन पुन्हा जगू
प्रेरणादायी असे काहीतरी
आता यापुढे उज्वल भविष्यासाठी
जीवनात पालक म्हणून करू...
भावी पिढी सक्षम बनवू
गणित प्रगतीचे लीलया सोडवू
कष्ट हवे तेचढे पुन्हा उपसू
एक नवा भारत घडवू....!
