नभ
नभ
1 min
313
नभ कृष्णवर्णी आले
चाहूल मेघराजाची
पवन मंद दमट
आली स्वारी पर्जन्याची
मेघांची दिव्य पालखी
लखलखाट विजेचा
पाहूनी काळ्या ढगांना
थयथयाट मोरांचा
नभ निळे हे निरभ्र
पावसाने चमकले
पानंपान हे तरुचे
उन्हात हो चकाकले
खग घरट्यात शांत
पंख पावसाने ओले
फडफड ती मोहक
उन्हात ते मोहरले
नभी दिनकर आला
पाही चमकते सोने
पावसाचे थेंब कसे
सोनेरी सूर्यतेजाने
