नातं मैत्रीच
नातं मैत्रीच
नातं मैत्रीच
जन्मताच नाती जुळतात कुटुंबाशी
आपले आई बाबा भाऊ बहिणीचं
मोठे होतो तशी नाती वाढतात पण
ह्या सर्वांत एक श्रेष्ठ असे नातं मैत्रीचं.
मैत्री कधी केव्हा कुणाशीही होऊ शकते
ती जात-धर्म,स्त्री-पुरुष वय पाहत नसते
ज्यांना आपण सर्वस्व मोकळेपणे सांगतो
तीच आपली खरी मैत्री त्या व्यक्तीशी असते.
विश्वासाची भरवस्याची एकमेका आधाराची
अडी अडचणीत मदत निस्वार्थी करणारी
प्रेमाला प्रेम जीवाला जीव देणारी, कठीण
प्रसंगीही अतूट मैत्रीचे बंधन जपणारी.
अशी मैत्री कधी होत असे नवरा बायकोची
तर कधी बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी
आई मुलाचे बाप लेकीचे ही नाते असे मैत्रीचे
मी ही ठेवले नाते मैत्रीचे माझ्या दोन्ही मुलींशी.
जेव्हा नात्यातील लोकांशी मैत्री जुळते
तेव्हा जणू स्वर्गाहुनी वेगळे ते नसते
सुख, शांती, समाधान मिळते त्यांना त्यांच्यात
नाते मैत्रीचे असल्यामुळेच त्यांना ते गवसते.
