नातं-आई आणि मुलीचं
नातं-आई आणि मुलीचं
खरंच किती लवकर मोठ्या होतात ह्या मुली...
तोतऱ्या भाषेत बोलणारी
कुरळ्या केसांच्या बटा सवरणारी....
सावळीशी छटा असणारी...
बाहुला-बाहुलीच लग्न लावणारी....
माझा पदर पकडून स्वयंपाक घरात लुडबुड करणारी....
घुंगरांच्या पैंजण घालुन
ठुमकून ठुमकून घर फिरणारी..
छोट्या-छोट्या गोष्टीसाठी
घर अंगावर घेणारी...
माहीत होतं मला परक्याच धन आहे तू....
उद्या मला सोडून जाणारच आहे....
पण माझ्यापेक्षा जास्त समजुतदार तूच निघालीस...
काग...काळजी करतेस...
संभाळीन ना मी दोन्ही घर...
अग... मुलगा घराचा दीपक
मग...मुली दिव्याच्या वातीच ना...
खरंच किती मोठी झालीय
माझी ही परी...
आठवतोय गं तो दिवस...
तुझं लग्न जुळलं ,
नि माझ्या मनाची कालवाकालव...
तुझ्या बाबांना म्हटलं...
कशी करेल हो ही पोरं...
तू ऐकलस...
माझ्या गळ्यात हात टाकून म्हणालीस, "विसरलीस"!!!
तूच म्हणायचीस ना.....
"सृष्टीच्या उत्पत्तीच प्रथम बीज म्हणजे स्त्री"....
नवीन नाती बनविण्यासाठीच तर हा स्त्री जन्म....
अग......
कुटुंबाचा सन्मान मी.....
तुम्हा दोघांचा अभिमान मी....
का!!!!
अशी हळवी होतेस....
तुझीच लेक मी....
तुझेच संस्कार माझ्यावर....
जीवनात येणारे सारे सुख-दुःख
करीन ग मी पार...
तुझी सारी कसरत
बघितलीय गं मी...
कधी काही कमी पडू दिला नाहीं...
कसं विसरेन गं मी हे सगळं...
तुझ्याच अंगणातली हिरवी तुळस ग मी...
कधीच नाही कोमेजनार...
आशीर्वाद दे...सदा अशीच
बहरनार.....
