STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

3  

प्रतिभा बोबे

Others

नाते मैत्रीचे

नाते मैत्रीचे

1 min
452

प्रत्येक नातं असावं

निखळ मैत्रीसारखं

प्रत्येकाने जोपासावे असे

दूधात साखरेसारखं


हेवेदावे नसावेत कधीच

कुठल्याच सुंदर नात्यामध्ये

भिंत काय कामाची कोणतीच?

दोन निर्मळ मनांमध्ये


प्रेमाने अन् मायेने जपावे

दोन्ही घरातले प्रत्येक नाते

मग बघा कोण तुम्हांला

स्वार्थी अन् मतलबी म्हणते


नाते सुंदर मैत्रीचे

जपावे प्राणपणाने

कृष्ण सुदाम्यासारखे

एक असावे मनाने


Rate this content
Log in