STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा

1 min
176

नारळी पौर्णिमेच्या सणाला

बंधु सखा गं येईल

दिस उजडल्यापासून बाई मी

वाट दारात पाहिल.....!!


बंधुराया माझा येईल

डोये भरून पाहिल

माहेरची आठवण सये

काळीज भरून येईल....!!


राखी लाख मोलाची

हातावरी गं बांधीन

पाहून बंधुरायास

मनी हरखीन......!!


नको ओवाळणी काही

ये रक्षणाला धावून

भरल्या ताटाने औक्षिन

मन गायी आनंदून......!!


ठेव मायेचा ओलावा

थोडी काळजात जागा

लहान धाकटी मी परी

नको करू वयनी तू त्रागा.....!!


सण भाग्याचा मोठा

मिळो भावाला सारे सुख

हात जोडून प्रार्थना

दूर जाऊ दे सारं दुःख....!!


भाऊ माझा पाठीराखा

ठेव ध्यानात सदा

नको आंतर देवू कधी

ना ओळवतील कडा....!!


Rate this content
Log in