STORYMIRROR

काव्य चकोर

Others

4  

काव्य चकोर

Others

नारीच्या नशिबी

नारीच्या नशिबी

1 min
315

न मागताच मिळाले सारे

मुखवट्यातले बेगडी चेहरे..

छद्मी हास्य अन लोचट शेरे

नारीच्या नशिबी हे भोग का रे..!!


तुला प्यारे तुझे सगे सोयरे

तू तयांस कधी छेडले का रे..

मीही कुणाची भगिनी बेटी

पण तुला ती वेगळी दिसते का रे..??


राम बनून जो घरात वावरे

तो बाहेर रावण बनतो का रे..

नात्याचे हे संदर्भ घरातले

पडता बाहेर बदलतात का रे..!!


तुझ्या चंचल मनाचे चंचल वारे

जरा अंतरात्म्यास टटोल ना रे..

संकुचित मनाची उघडा दारे

सन्मान जरा नजरेत भरा रे..!!



Rate this content
Log in