नारी शक्तीचा
नारी शक्तीचा
1 min
245
नारी तू न अबला आता
स्त्रीशक्ती तुझी विश्वत्राता
असाध्य ते साध्य करिसी
सर्वांसी तूच स्फूर्ती दाता
-1-
सृजनकर्ती तूच माता
ऋण तुझे मानी विधाता
संसाररथाचे तू चक्र
सांभाळी डोलारा प्रघाता
-2-
भावबंध जपता घाता
नात्यांचा तो अर्थ उद्गाता
संस्कृती संस्कार वर्धन
भूमिका निभावता जाता
-3-
मनाई न आकांक्षा पाता
साधनांनी भरला भाता
स्वैर संचार सर्वक्षेत्री
मुद्रा उठवीते प्रख्याता
-4-