STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

नारी अशी आता तरी"

नारी अशी आता तरी"

1 min
245

ओझे किती नेशील तू हो निडरशी आता तरी

भयमूक्त झाली पाहिजे नारी अशी आता तरी।।

विरघळुन ह्या देहात मी झुरते किती सांगू कशी

हृदयात दडपण दाह घे समजूनशी आता तरी।।

काटे, फुले, आयुष्य, मी, आता तुला जे मानले

कैफियत माझी मांडता तू जाणशी आता तरी।।

साकारुनी आत्मास ह्या ,आसावली दुःखात मी

जगले कुठे माझ्यात मी, शिकले तशी आता तरी।।

चौकात चुनरी ओढुनी, शमले नराधम का कुठे,

शौर्यास साऱ्या जाण तू, का लाजशी आता तरी...

तू चेतना बलिदान तू, पण जाणते आनंद तू

निर्भया अशी बघ ना कुठे, का भाळशी आता तरी।।

जाणायचे अस्तित्व का , साधेच 'मीनाक्षी' तुझे

तू जाण साऱ्या त्या रिती, अन थाटशी आता तरी।।


Rate this content
Log in