नाम तुझे... प्रणू (चाराक्षरी)
नाम तुझे... प्रणू (चाराक्षरी)
1 min
400
देवा तुझा
लाभो संग
किर्तनात
मन दंग
भावभक्ती
माझी साधी
नाम तुझे
सर्वां आधी
शब्द फुले
ओंजळीत
नाम तुझे
लाखोळीत
अनंताचा
धरे संग
सुखात या
भरे रंग
निर्विकार
भाव सजे
भजन हे
मन भजे
दर्शन हे
मज व्हावे
भाव माझे
तू जाणावे
क्रिष्णरुप
मुकुंदाचा
नाद घुमो
बासरीचा.
