STORYMIRROR

Babu Disouza

Others

4  

Babu Disouza

Others

नाखवा

नाखवा

1 min
207

वल्हव रे नाखवा दर्याचांदणी होडी तुझी

जगास रे दाखवा सखी नांदणी जोडी तुझी


नको जाऊ दूर खोल सागरी उगा भुलूनी

लक्षात ठेव गोष्ट एव्हढी वाट पाही कुणी


चंचल सागरी मत्त लाटा ये उचंबळूनी

जाळे ओढून अतिश्रमाने जाशील गळूनी


उपजिविकेला संसाराला गरज कष्टांची

उधाणल्या दर्यात होती हेलकावे होड्यांची


जाळ्यात गावले सारंगा नेऊ बाजारा बिगी

येता मनाजोगी किंमत होई कोळ्याची सुगी


साहित्याला गुण द्या
लॉग इन