STORYMIRROR

काव्य चकोर

Others

4  

काव्य चकोर

Others

न वाचलेलं पुस्तक

न वाचलेलं पुस्तक

1 min
230

तू वाचलं नाही पुस्तक कधी

नुसतीच पानं पालटत गेली

तुला कल्पना नसेल कदाचित

पण मनाची पानं चुरगळत गेली..!


नाही! वाचलेच पाहिजे असे नाही

पण किमान चाळायला तरी हवे होते

नियम जरी अलिखित असले

तरी संकेत त्यांचे पाळायला हवे होते..!


तसं कळतंय मलाही 

हल्ली वेळेअभावी वाचन होत नाही

पण म्हणतात ना मानसिकता हवी

नेमकी तीच कुठे दिसत नाही..!


न पेक्षा एक काम कर!

बंद कर पुस्तक अन् फेकून दे रद्दीत

खात्री आहे, कधीतरी कामास येईल 

तेच "न वाचलेलं पुस्तक" तुझ्या अडीअडचणीत..!


Rate this content
Log in