STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

न‌ लढलेली लढाई

न‌ लढलेली लढाई

1 min
197

भ्रष्टाचार चळवळी

पोकळ घोषणा दिल्या

ताकदीच्या जाणीवेने

हवेत विरून गेल्या ||१|| 


क्रांतीची घेतली ज्योत

त्यांनी आपापल्या हाती

नाही तेवत राहिल्या 

निर्धाराच्या मौल्य ज्योती ||२|| 


भ्रष्टाचाराची ही मुळे

खोलवर रुजलेली

सापडेल काही त्यांना

स्वत:च्या त्या घराखाली ||३|| 


आतुनी पेटले सारे 

आग ही धुगधुगती 

ज्वाला भडकल्यावरी

वाटे अनामिक भीती ||४|| 


संघटित सारे भेटू

म्हणुनी पाठी फिरले

मनाच्या गुहेत फुले

आगरकर दिसले ||५|| 


सामान्य लोक भेटती

विषय हा टाळतात

वरवरचे बोलूनी 

मनी घुसमटतात ||६|| 


Rate this content
Log in