STORYMIRROR

काव्य चकोर

Others

4  

काव्य चकोर

Others

मुक्तीचा साक्षात्कार

मुक्तीचा साक्षात्कार

1 min
461

आज ती जरा चिडलेली वाटली..

जणू लखलखणाऱ्या दिव्यावर काजळी दाटली..

म्हणाली, नको संसार नको मायाजाल

मुक्ती हवी मला..

इतकं सगळं करून साधं कौतुक नाही कुणाला..??


हसलो मी, म्हणालो नाकारलंय कोणी..?

तू पात्रच आहेस कौतुकाला, मी कधी अडवलंय का तुला..?

तू मुक्तच आहेस तुझ्या घरात, मी कधी बांधलंय का

तुला कोणत्या चौकटीला..?

चल, माझंही अनुमोदन आहे तुला..!!


नको पेटवू चूल सुट्टी दे कामाला जेवण बाहेरून मागवू

बोल आणखी काय हवंय तुला..?

काळजी नको मुलांची पैसे देऊ खाऊला..

मी बाहेरच जेवतो, दे सुट्टी डब्याला..

नको संसार नको मायाजाल कारण मुक्ती हवीय तुला..!!


आता अधिकच चिडली म्हणाली,

काही हाड आहे का जिभेला..?

म्हणे पैसे देऊ मुलांना? मग मी आई ती कशाला..?

काही नको बाहेरचं, उगाच आमंत्रण आजाराला..

माझ्याशिवाय सांगा कोण बघणार तुम्हाला..?

तुमच्या आनंदात खरा आनंद मिळतो मला..!!


मी हसलो पुन्हा म्हणालो, ठीक आहे

तुझी तू मुक्त आहेस माझं अनुमोदन आहे तुला..

पण खरं सांगू! आपणच बांधून घेतलंय स्वतःला

प्रेमाच्या धाग्यात कधी न सुटण्यासाठी..

अन् आखून घेतलीय चौकट सामंजसपणाची

तशी आवश्यक असतेच म्हणा

संसाराचा फोटो सुंदर दिसण्यासाठी..!!


आता ती हसली गालात जणू मुक्तीचा साक्षात्कार झाला..

मिटून गेला विरोध उत्साहाचा संचार झाला..

वाहून घेतले स्वतःस पुन्हा आपल्या कामाला..

विसरली देहभान, विसरली साऱ्या जगाला..

उडून गेली सारी काजळी अन् दिवा लख्ख तेजाळला..!!


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ