मुक्ताफळे
मुक्ताफळे
1 min
235
हव्यासाची मुक्ताफळे,
रोगराईचे उगवी मळे.
प्रत्येकांच्या आयुष्याशी खेळे,
पाही उजळून सौज्यन्याची फळे.
भष्ष्ट्राचाऱांची मुक्ताफळे,
हरामाचा पैसा खाण्याकडे वेळे.
कधीतरी भोगणार कर्माची फळे,
आडमार्गाची पावले संस्काराकडे वळे.
महापूरास देत आमंत्रणे,
खारफुटीवर बांधून इमले.
स्वतःच्या पायावर घेऊन कुराटे,
नशीबाच्या नावाचे भोग तू मुक्ताफळे.
बस झाली मुक्ताफळे झाड तोडण्याची आता.
मनामनात रूजवू वनसंवर्धनची गाथा.
जाणून घेऊ लवकर जनजागृतीची व्यथा,
नाहीतर फोडावा लागेल आपलाच माथा.
